आतापर्यंत धर्माच्या नावावर झाले-गेले मुद्दे विसरून जावे.परंतु आता धर्माच्या नावावर नवीननवीन मुद्दे उपस्थित करून हिंदू -मुस्लिमांमध्ये कटुता निर्माण करणे योग्य नाही.यामुळे कट्टरतावाद निर्माण होवून संघर्षाची चिंगारी केव्हाही भडकु शकते व देशातील शांतता भंग होवू शकते.मंदिर-मज्जितचे मुद्दे कायद्याच्या चौकटीतुन निवळत आहे व काही निवळले सुध्दा आहे.परंतु नव्याने आपणच जर असे मुद्दे निर्माण केले तर कटुता निर्माण होईल व व्देष भावना वाढेल व संघर्षाची भावना निर्माण होईल.त्यामुळे डॉ.मोहन भागवतांचे वक्तव्य स्वागतार्ह असून देश हिताचे असल्याचे मी समजतो.कारण मोहन भागवतांचा अभ्यास दांडगा आहे.त्यामुळे देशातील संपूर्ण घडामोडींवर त्याचे लक्ष असते. त्यामुळेच त्यांनी देशहितासाठी नव्याने मंदिर-मज्जीतचे मुद्दे उचलण्यावर सुचक व देश हिताचे विधान केले यात दुमत नाही.जगात भारतीय संस्कृती आगळीवेगळी आहे त्याचे जतन सर्वांनीच केले पाहिजे हेच मोहन भागवतांनी सांगितले.जगाच्यापाठीवर भारताची आगळीवेगळी छाप आहे.भारतात अनेक भाषा, अनेक पंथ, अनेक धर्म, अनेक संस्कृती दिसून येते त्यामुळे जगात भारताची प्रतिमा आगळीवेगळी आहे.भारतासारखी एकता जगात कोणत्याही देशात दिसून येत नाही आणि दिसणार पण नाही.कारण भारतभुमिचे स्तोत्र देवी -देवता,महाग्यानी, साधु-संत,थोर महात्मे, क्रांतिकारक,मवाळवादी-जहालवादी अशा आगळ्यावेगळ्या संगमाने भारत भुमि तयार झोलेली आहे.त्यामुळेच या भुमित सर्व धर्मांचे लोक एकोप्याने राहतात. ही बाब संपूर्ण जग जानते की हिंदू धर्म हा शाश्वत धर्म आहे. त्याच पध्दतीने समाज, कुटुंब, सृष्टीचा विचार केला पाहिजे. राजकीय दृष्ट्या मुस्लिम किंवा अन्य धर्मासोबत कटुता निर्माण करणे योग्य नाही असे मला वाटते.गेल्या पाच हजार वर्षांपासूनचा तर आतापर्यंतचा विचार केला तर या काळात अनेक उतार चढाव आलेत ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.परंतु प्रत्येक वेळेस वेगवेगळी परिस्थिती होती.त्या-त्या पध्दतीने धर्माचा, संस्कृतीचा विचार केला जात असे.हि बाब सत्य आहे की ज्या ठिकाणी मज्जीत आहे त्या बहुतेक ठिकाणी हिंदू देवीदेवतांचे अवशेष आहेत.परंतु आपण जर अशाच पध्दतीने धर्माच्या नावाखाली आपसात भांडत रहालो तर आपल्या संस्कृतीचा, धर्माचा आणि एकतेला खिंडार पडेल.अयोध्येत रामाचे वास्तव्य होते त्यामुळे अयोध्येत राममंदिर व्हावे अशी सर्वांची इच्छा होती.परंतु तिथे मज्जित असल्याचा दावा मुस्लिम पक्षांकडून करण्यात आला होता व हा वाद सुप्रीम कोर्टात गेला.सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर हा वाद सामंजस्याने सोडविण्यात आला व दोन्ही पक्षांच्या सहमतीने अयोध्येत भव्य राममंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला.परंतु आता नव्याने मंदिर-मज्जीतचे मुद्दे उचलुन धर्माच्या नावावर संघर्ष करणे टाळले पाहिजे.कारण देशात अनेक नवीन -नवीन समस्या निर्माण होत आहे.आज संपूर्ण जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे,औद्योगिकीकरण वाढले आहे यामुळे प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वाचे आरोग्य धोकादायक स्थितीत आहे आणि आज प्रदुषणाच्या बाबतीत भारत पहिल्या नंबरवर आहे यावर मात करण्यासाठी वृक्षलागवडीवर सर्वच धर्मांच्या लोकांनी लक्ष दिले पाहिजे, वाढती महागाई, बेरोजगारी, कुपोषण, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढत्या दुर्घटना यावर सर्वांनीच जातीने लक्ष देण्याची गरज आहे.
यामुळे धार्मिक भावना जागृत होईल, संस्कृतीचा सर्वत्र आभास होईल,हिंदू -मुस्लीम-शिख-ईसाइ-बौध्द यात मित्रता वाढेल व सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण होईल.मग तो कोन्हीही असो धर्माच्या आड जर कोणी कट्टरतावाद निर्माण करीत असेल तर औरंगजेब व आपल्यात काहीच फरक रहाणार नाही.त्यामुळे कोणतीही राज्य सरकारे असो धर्माचा वापर बदल्यांच्या भावनेतून करू नये.यामुळे कट्टरतावाद निर्माण होवून कटुता निर्माण होते.आज जगाच्या पाठीवर भारत विश्व शांतीचे प्रतीक म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे पहात आहे व आपल्याला विश्व गुरू समजतात.अशा परिस्थितीत जर आपण पुन्हा-पुन्हा हिंदू-मुस्लिम वाद निर्माण केला तर जग आपल्याला वेगळ्या नजरेने पाहिल. डॉ.भागवतांनी उदाहरण देतांना सांगितले की औरंगजेब यांचा कार्यकाळ कट्टरतावादाचा होता.परंतु त्यांचे वंशज बहादुरशहा जफर यांनी १८५७ मध्ये गोहत्या वर बंदी लावली होती असे अनेक उदाहरणे आहेत.इंग्रजांनी भारतात फुट पाडण्यासाठी हिंदू -मुस्लिमांमध्ये दरार निर्माण केली व एकता भंग करून इंग्रजांनी भारतावर दिडशे वर्ष राज्य केले.परंतु आज आपण स्वतंत्र आहोत व जगात भारताची वेगळी छाप आहे.आज जगात अनेक कट्टरपंथी देश आहेत.परंतु त्याचे दुर्दैव की ते आजही रक्ताच्या लाथोळ्यात गुरफटून आहेत.त्यामुळे जुना वाद सोडुन नव्याने भारत निर्माण केला पाहिजे.डॉ.मोहन भागवतांनी ३ जून २०२२ ला म्हटले होते की “इतिहास मे हुई गलतियोंको भुलाकर हिंदूओंको हर मस्जिद के नीचे शिवलिंग नहीं ढूंढना चाहिए”असे सुचक विधान त्यांनी त्यावेळेस केले होते.म्हणजेच आपल्याला समाज, संस्कृती,एकता व अखंडता सुनिश्चित करण्यासाठी जुन्या गोष्टींना विराम देऊन सर्वांनाच नवीन प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.सर्वच धर्माच्या लोकांनी बदलत्या काळानुसार चालले पाहिजे व आपण सर्वांनी एकत्र रहाण्याची संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने केला पाहिजे.जय हिंद!
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.
