अशोक गायकवाड
अंबरनाथ : अंबरनाथ मधील गोल्डमॅन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ) पक्षाचे अंबरनाथ शहर माजी अध्यक्ष, माजी नगरसेवक, अजय जाधव यांना विविध संस्था संघटनेच्या वतीने रविवारी,(दि.२२) रोजी भावपूर्ण आदरांजली वाहन्यात आली. अध्यक्षस्थानी दत्ता सरवदे होते.
दिवंगत अजय जाधव हे अंबरनाथ मधील गोल्ड मॅन म्हणून ओळखले जात होते. दलित पँथर ते रिपब्लिकन चळवळीत ते कार्यरत होते. पुण्यानुमोदन कार्यक्रमात प्रारंभी ब्रम्हदेश येथील भन्ते प्रियदर्शी आणि बुद्धगया येथील भन्ते बौद्धरत्न यांनी धार्मिक कार्यक्रम आटोपला. बौद्धाचार्य मोरे यांनी प्रवचन दिले. या प्रसंगी झालेल्या आदरांजली सभेत भारतीय बौद्धमहासभा राज्य शाखेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर बर्वे, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहर सचिव, माजी नगरसेवक कबीर गायकवाड, अंबरनाथचे माजी उप नगराध्यक्ष वाघमारे, नासिक विभागातील सरपंच अर्जुन डांगळे, कवी दादा पगारे, वसंत जाधव, मनोज दोंदे, फारूक शेख आदिची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. शोकसभेला माजी नगरसेवक नासिर कुंजाली, आर. पी. आय अंबरनाथ शाखेचे सचिव दिलीप जाधव, ऑर्डनन्स चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटनेचे नेते बी बी मडीखांबे, जयभीम सोसायटीचे प्रतिनिधी सुनील अधांगळे, महिला कार्यकर्त्या रोशनी शेख, निर्मला घोक्षे आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते उद्योजक यश जाधव यांनी केले होते तर सूत्रसंचालन डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष राहुल हंडोरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *