ठाणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत संविधानाचे निर्माते भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात देशभरात पडसाद उमटले आहेत. बुधवारी कोपरी भागातील आनंदनगर मधील भीमसैनिकांनी निषेध रॅली काढून आपला रोष व्यक्त केला.
दोन हजाराहून अधिक भीमसैनिक, संविधानप्रेमी नागरिकांचा समावेश असलेल्या निषेध रॅलीची सुरुवात आनंदनगर कामगार कल्याण केंद्राच्या पटांगणातून झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बुद्धविहार मार्गे ही रॅली बारा बंगला सर्कल जबळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी आली. त्यावेळी अनेक नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करत अमित शहा यांच्या केंद्रीय गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली. संतापलेल्या नागरिकांनी अमित शहा यांच्या छायाचित्राचे यावेळी दहन केले. मिलिंद बनकर, पत्रकार आनंद कांबळे, प्रविणभाऊ गायकवाड, विजय दळवी, सोनाली सरदार, निलेश खैरे, संदीप बनकर, वृषाली दळवी-जाधव, भरत उबाळे, हिरा वानखेडे, योगेंद्र (बाळा) हाटे , महादेव बोकडे, प्रवीण झेंडे, राहुल कांबळे, सुभाष भोसले, शरद वायदंडे, उत्तम खाडे, पत्रकार नितीन दूधसागर, रवींद्र बच्छाव, हरेश दारोळे यांच्यासह दोन हजाराहून अधिक नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.
00000
