पनवेल : दुंदरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश पाटील व कुटुंबियांच्या नूतन निवासनिमित्त शनिवार दिनांक २८ डिसेंबर रोजी चिंचवली येथे वास्तू शांती, सत्यनारायण महापूजा आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
चिंचवली येथील शिव ग्रंथा व्हिला येथे होणाऱ्या या सोहळ्यात दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६. ३० वाजता स्वरगंध व भक्तीगीतांचा कार्यक्रम होणार असून रायगड भूषण विद्याधर ठाकूर यांचे गायन होणार आहे, त्यांना तबल्यावर संतोष खरे, टाळवादन अरुण भोपी, तर मानसी चौधरी, आकांक्षा सकपाळ, रेश्मा घाटे सहगायन साथ देणार आहेत. तसेच रात्री ९. ३० वाजता श्री वरलेश्वर वारकरी भजन मंडळ चिंचवली यांचे भजन होणार आहे. गुरुवर्य माळी गुरुजी यांचे शिष्य रमेश पाटील, गणेश पाटील, बाळुबुवा शेळके, सदानंद साळवी, बाळाराम गवळी यांची गायन तर मृदुंगावर विकास भगत, राम शेळके, राजेश पाटील यांची साथ असणार आहे. या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ह. भ. प. सीताराम पाटील आणि आणि कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
00000
