राजीव चंदने
मुरबाड :‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ श्रमदानातून कुठली गोष्ट अशक्य नाही, अशाप्रकारे विद्यार्थ्यांना धडा देणारे जिल्हा परिषद शाळा कन्होल बोरिवलीचे शिक्षक नितीन राणे सर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन विद्यार्थी व त्याचे पालक वर्ग यांनी स्वतः पुढाकार घेऊन  वनराई बंधारा बांधण्यासाठी सुरुवात केली असता त्यावेळी ग्रामपंचायत सरपंच रेश्मा घरत, भरत घरत, बाळा घरत, हिरामण घरत, पोलीस पाटील अण्णा घरत, भाऊ घरत, सुभाष घरत, कुणाल पवार,कान्होळ-बोरिवली चे ग्रामसेवक जितेश पवार, अर्चना घरत, आशुतोष घरत, व बोरिवली शाळेतील इयत्ता चौथी पाचवी चे विदयार्थी व शिक्षक वृंद बोरिवली यांच्या श्रमदानाने वनराई बंधारा बांधण्यात आला..विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्व कळले… छोटे छोटे धरण,ओढे यांना बांध घातल्यानंतर पाणी आडवल्यानंतर.. पशुपक्षी, प्राणी, मानवाला शेतीसाठी पाण्याचा कसा उपयोग होतो. गाव तिथे वनराई बंधारा ही संकल्पना अमलात आली पाहिजे असे   नितीन राणे सरांनी सांगितले. पाणी हे जीवन आहे, जलसाठे कमी होत आहेत.म्हणून पाणी जपून वापरा. पाण्याचे महत्व प्रत्येक विद्यार्थ्याला,गावाकऱ्याला कळलं पाहिजे…
जिल्हा परिषद शाळा बोरविली ने यावर्षी क्रीडा स्पर्धा व व सांस्कृतिक विविध गुणदर्शन स्पर्धा मध्ये खूप प्राविण्य मिळवले आहे… लहान मुलं असून सुद्धा नाट्य प्रकारामध्ये शैक्षणिक तालुका म्हसा मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे आहे. अशा प्रकारचे अनेक उपक्रम या शाळेने राबविले आहेत त्या मुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांचा वर जिल्ह्यातील अभिनंदनचा वर्षाव  होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *