मुंबई : सेवा क्षेत्राची राजधानी मानल्या गेलेल्या मुंबईने स्टार्टअपमध्येही गती पकडण्यास सुरूवात केली आहे. देशातील सात मोठ्या शहरांच्या केलेल्या सर्वेक्षणामध्ये मुंबईने या क्षेत्रात दुसरा क्रमांक पटकावला असून शहरात ३६ नवे स्टार्टअप सुरू झाले आहेत. कर्नाटकची राजधानी बंगळुरूने पहिला क्रमांक अबाधित ठेवला आहे. या शहरांत ६६ नवे स्टार्टअप सुरू झाले आहेत.
मुंबईत अव्हेन्यू सुपर मार्ट अर्थात डी-मार्ट ही सर्वात मोठी किमती कंपनी असून बंगळुरूमध्ये स्वीगी ही सर्वात मोठी स्टार्टअप कंपनी बनली आहे. सर्वांत कमी स्टार्टअप हैदराबादमध्ये ६ तर पुण्यात अवघे ७ स्टार्टअप सुरू झाले आहे. आरोग्य विमा कपंन्यांनी मोठी भरारी घेतली असून चेन्नईमध्ये स्टार हेल्थ तर नवी दिल्लीत मॅक्स हेल्थ केअर या सर्वांत मोठ्या कंपन्या बनल्या आहेत. तर गुरुग्राममध्ये ही जागा झोमॅटो या कंपनीने घेतली आहे.
00000