कल्याण : महाराष्ट्र प्रदेश भाजपा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेशद्वारे सदस्यता नोंदणी अभियानासाठी कोकण प्रांत विभागातील भाजपा संघटात्मक जिल्ह्यांची सभा अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली वसंत स्मृती,(दादर) येथे पार पडली. यावेळी प्रमुख मार्गदर्शन प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री दिलीप कांबळे यांनी केले. यावेळी सर्वस्तरावर अनुसूचित जाती मोर्चा द्वारे समस्या सोडविण्याचे वं न्याय देण्याचे काम एकत्र करणार असे आश्वासन दिले.
तर सदस्यता नोंदणी अभियान अधिक सक्षम राबाविण्याबाबत माहिती प्रदेश सरचिटणीस शशिकांत कांबळे यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना प्रदेश उपाध्यक्ष ॲड. डॉ राजु राम यांनी उपस्थितांना सांगितले की मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात पंधरा लाख सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष ठरविले आहे आणि हे लक्ष सर्वांनी मिळून पुर्ण करायचे आहे. यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर तुरेकर, भुषण कांबळे, पदाधिकारी, कोकण विभागातील जिल्हाध्यक्ष, मंडळ अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
