राज्यात देवाभाऊच सुपरहीट !

२८८ पैकी १२९ नगराध्यक्ष भाजपाचे

 महाराष्ट्रात भाजपच नंबर १

मुंबई : महाराष्ट्रात अखेर देवाभाऊच सुपरडूपर हीट असल्याचे नगरपरिषद निकालाने दाखवून दिले. महाराष्ट्रातील २८८ पैकी एकुण १२८ नागराध्यक्ष एकट्या भाजपाचे निवडूण आले आहेत.  २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत हा दुप्पट यशाचा टप्पा मानला जात आहे.

गेल्या निवडणुकीत विविध नगरपालिकांमध्ये भाजपचे १६०१ नगरसेवक होते, तर यंदाच्या निकालांमध्ये ही संख्या थेट ३३२५ वर पोहोचली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ६१ नगराध्यक्षांसहीत दुसऱ्या क्रमांकवर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. महाविकास आघाडीत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर उध्दव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्या तर शरद पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर राहीली.

शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकण पट्ट्यात यापूर्वी भाजपला फारसा शिरकाव करता आला नव्हता. मात्र, फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर २०१४ पासून भाजपने कोकणात आपली ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, त्याचे प्रतिबिंब यंदाच्या निवडणूक निकालांत दिसून येत आहे.

नगरपरिषद व नगरपंचायत निकालांनी राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाचे संकेत दिले असून, आगामी स्थानिक व महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.

हा जनतेन आमच्या कामावर दाखविलेला विश्वास आहे अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. मी यापूर्वीच भाकीत केले होते की, एकूण जे काही नगराध्यक्ष निवडून येतील त्यांपैकी ७५ टक्के हे महायुतीचे निवडून येतील. त्याच पद्धतीचा कौल जनतेने दिला आहे. विशेतः भारतीय जनता पक्ष हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे, हे देखील पुन्हा एकदा अधोरेखित झाले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही. जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाला आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
“विशेषतः आमचे सहकारी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांचेही मी अभिनंद करतो. त्यांच्याही पक्षाने अतिशच चांगला परफॉर्मन्स दिला आहे. एक प्रकारे विधानसभेचा परफॉर्मन्स आम्ही रिपिट केला आहे. पहिल्यांदाच आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात ही निडवणूक होत होती आणि या निवडणुकीत एक मोठं यश भारतीय जनता पक्षाला मिळालं या बद्दल मी रविंद्र चव्हाण यांचेही अभिनंदन करतो. हा एक अभूतपूर्व विजय मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे, २०१७ पेक्षाही हा विजय मोठा आहे.

शिंदेंच्या ठाण्यातील बालेकिल्ल्यांना सुरुंग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रभावक्षेत्र मानल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरातील नगर परिषदांमध्ये भाजपाने शिंदेंना जबर धक्का दिला आहे. तसेच दोन्ही ठिकाणी नराध्यक्षपदी भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.
अंबरनाथ आणि बदलापूर येथील नगर परिषदांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिलेली होती. तसेच शिवसेनेत फूट पडल्यानंतर येथील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटासोबत गेले होते. दरम्यान, या दोन्ही नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपा अशीच मुख्य लढत झाली होती. तसेच दोन्हीकडून टोकाचा प्रचार आणि आरोप प्रत्यारोप झाले होते.

दरम्यान, बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपाच्या रुचिता घोरपडे आणि शिवसेना शिंदे गटाच्या वीणा म्हात्रे यांच्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. ठाकरे गटाने येथे प्रिया गवळी यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत निकाल मात्र भाजपाच्या बाजूने लागला. तसेच भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रुचिता घोरपडे यांनी सुमारे १० हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजय मिळवला. बदलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २३ आणि भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले. तर अजित पवार गटाच्या ३ नगरसेवकांनी विजय मिळवला.
तर अनेक आरोप प्रत्यारोपांमुळे गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्येही भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मुख्य लढत झाली. तर काँग्रेसनेही या दोन्ही पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले होते. दरम्यान, अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर आणि भाजपाच्या तेजश्री करंजुले यांच्यात झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेजश्री करंजुले यांनी सुमारे ६ हजार मतांच्या मताधिक्याने विजय मिळवला. अंबरनाथमध्ये शिवसेना शिंदे गटाचे २७, भाजपाचे १३, काँग्रेसचे १२ अजित पवार गटाचे ४ तर इतर २ नगरसेवक विजयी झाले.
घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले – एकनाथ शिंदेंची
ठाणे : जसे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले, त्याचप्रकारे नगरपालिका आणि नगर पंचाययतींच्या निवडणुकीत मिळाले आहे.

जे लोक या निवडणुकीत घरी बसले होते, ज्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले होते, त्या लोकांना मतदारांनी घरी बसवले अशा शब्दात विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरेंवर निशाना साधला. लोकांना काम करणारा नेता हवा असतो, घरी बसणारा नाही. काम करणाऱ्या नेत्यांना मतदान केले, घरी बसणाऱ्यांना घरी बसवले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असते. मी आमच्या नेत्यांना सांगितले होते की, कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहा, त्याप्रमाणे नेत्यांनी केले. आम्ही पक्षासाठी काम करणाऱ्या तळागळातील कार्यकर्त्यांना तिकीटे दिली, त्यामुळे सर्वसामान्य जनतेनेही आम्हाला साथ दिली. काही ठिकाणी आम्ही महायुती म्हणून एकत्र, तर काही ठिकाणी वेगवेगळे लढलो, पण शेवटी महायुती जिंकली आहे. हीच आमच्या कामची पोचपावती आहे. सर्व मतदारांचे पुन्हा एकदा आभार मानतो, असे शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *