मुंबई : महापालिकेच्या निवडणूकीत विचारधारेपेक्षा जिंकून येणे हाच निकष प्रमाण मांडीत शरद पवार आणि अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या निवडणूकीत युती करण्याचे जाहिर केले आहे. गमंत म्हणजे दोन्ह पक्ष सर्वोच्च न्यायालयात पक्षावरील मालकीवरून भांडत असताना आता जनतेच्या न्यायालयात मात्र पुन्हा एकत्र निवडणूक लडवित आहेत. मुंबई महापालिका ठाकरेंच्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधू जसे एकत्र आले तस पुण्यावरील मालकीसाठी दोन्ही पवार एकत्र आले असल्याची प्रतिक्रीया राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.

पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र येणार असून २६ डिसेंबर रोजी स्वता अजित पवार याची घोषणा करणार आहेत. यासंदर्भाने उद्या अजित पवार मुंबईत आढावा घेणार आहेत. दरम्यान, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनंतर शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या तर मी पक्षातून राजीनामा देईन, असा इशारा दिला होता. मात्र, प्रशांत जगताप यांच्या या इशाऱ्याने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडलेला दिसत नाही.
एकत्र येण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रस्ताव
पुण्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व पक्षांच्या आघाडीचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी हातमिळवणी करून ठाकरेंच्या शिवसेनेलाही सोबत घेणार असल्याची चर्चा सुरु आहे.  अजित पवारांना याबाबत प्रस्ताव दिला जाणार असल्याची माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली. मात्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही शक्यता फेटाळून लावलीय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *