मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने व ताकदीने उमेदवार उतरवणार – सुनिल तटकरे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसची जी तिसरी यादी जाहीर होईल त्यामध्ये सर्व उमेदवार पूर्ण ताकदीचे व क्षमतेचे असतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना व्यक्त केला.
सोलापूर, रायगड जिल्ह्यातील पनवेल, कोल्हापूर, नाशिक या सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूका लढल्या जात आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती आहे तर काही ठिकाणी तिन्ही पक्षांची युती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे याची जाणीव महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांना आहे. त्यामुळे दिर्घकाळानंतर झालेल्या निवडणुका असल्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठया प्रमाणावर आहेत. ज्यावेळी युती करत असतो त्यावेळी जागा वाटप करताना मित्र पक्षांना जागा सोडाव्या लागतात त्यामुळेच युती न होण्याची शक्यता व्यक्त करतानाच महायुतीला महाराष्ट्रात प्रचंड यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
मुंबई हे बहुभाषिक, बहुधर्मीय शहर आहे. मात्र महानगरपालिकेसाठी राजकीय पक्षांची यादी बघितली तर त्यामध्ये सर्व धर्माचे उमेदवार आहेत. मुंबईत ख्रिश्चन,आंबेडकरी चळवळीवर श्रध्दा असणारा मोठा वर्ग आहे. काही जागा राखीव असतात. मुंबईत हिंदी भाषिक, उत्तर भारतीय आहेत. अशावेळी त्यांची उमेदवार म्हणून निवड करणे अयोग्य आहे असे म्हणणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या मुलभूत विचारांबद्दल शंका घेण्यासारखं होईल असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असलेला एक विभाग आहे. त्यातून विधीमंडळ प्रतिनिधीत्व केले जाते. त्यामुळे साहजिकच आहे त्याठिकाणी जागा जाणार आहेत आणि त्यात सहा ते सात नगरसेवक असतात. त्यामुळे विशिष्ट समाजाला प्रतिनिधीत्व दिले हा माझ्या पक्षावर आरोप होत असेल तर तो अनाठायी आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *