मुंबई: अवघा महाराष्ट्र ज्या राजकीय सभेची वाट पाहत आहे त्या ठाकरे गर्जनेची तारीख अखेर ठरली आहे. येत्या रविवारी ११ जानेवारील शिवाजीपार्कवर तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरून ठाकरे गर्जना करणार आहेत.
मुंबई महापालिकेने राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या सभेला ११ जानेवारी रोजी परवानगी दिली आहे, ११ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची संयुक्त सभा होणार आहे. तर १२ जानेवारीला भाजप आणि शिवसेनेची मुंबईतील भव्य संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करतील.
लाव रे तो व्हिडीयोसाठी बरेच व्हिडीयो आपण जमा केलेत अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यामुळे राज ठाकरेंच्या फटकेबाजीसोबत उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या असा दुहेरी मारा भाजपा आणि शिंदे सेनेला अनुभवा लागणार आहे.
येत्या ११ जानेवारीची ठाकरे बंधूंची ही सभा रेकॉर्डब्रेक गर्दीची होईल असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
