काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांची प्रचारात आघाडी
विजयी झाल्यास वार्डातील विकास कामे करण्याचे सुरेशचंद्र राजहंस यांचे आश्वासन
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली असून काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. वार्ड क्रमांत २६ मधून काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष व रिपाइं (गवई) आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांनी प्रचारात आघाडी घेतली. घरोघरी जाऊन ते जनतेशी संवाद साधत आहेत. जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद अत्यंत चांगला असून काँग्रेस विचाराच्या या वार्डातून आपला विजय होईल, असा विश्वास सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केला आहे.
वार्ड क्रमांक २६ हा सातत्याने काँग्रेस विचाराचा राहिला असून या भागातील जी विकास कामे झालेली आहेत ती काँग्रेसनेच केली आहेत. काँग्रेसचे विलासराव देशमुख सरकार असताना या भागातील सर्वसामान्य जनतेला घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे. मागील निवडणुकीचा अपवाद वगळता येथील जनतेने काँग्रेस उमेदवारालाच विजयी केले आहे. भाजपाच्या उमेदवाराने मागील पाच वर्षात काहीही काम केलेले नसून स्थानिक जनता त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. काम करणाऱ्या उमेदवारालाच जनता मतदान करेल, असा विश्वास व्यक्त करून सेवा करण्याची संधी जनतेने द्यावी, असे आवाहन काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र राजहंस यांनी केले आहे.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड व माजी मंत्री आमदार अस्लम शेख यांनी या भागात प्रचार करून काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेशचंद्र साहेबराव राजहंस यांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
