ठाणे पूर्व, पश्चिम, आनंद नगर, कशीश पार्क, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, इंदिरा नगर यांसारख्या प्रमुख मार्गांवर एकनाथ शिंदे यांनी बाईक रॅली करी ठाणे महानगर पालिकेच्या निवडणूकीसाठी प्रचार केला. यावेळी दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी उसळली होती. भगवे झेंडे आणि महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. लाडक्या बहिणीदेखील मोठ्या उत्साहात याप्रसंगी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या.
