माझा कोणत्याही उद्योगपतीला विरोध नाही, पण सगळे उद्योग एकाच उद्योगपतीकडे का? त्या उद्योगपतीच्या आडून मराठी ठसा पुसण्याचं काम केलं जात असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली. मुंबई विमानतळ अदानीने ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी गरबा खेळण्यात आला. त्या माध्यमातून मराठीची ओळख पुसून टाकण्याचं काम करण्यात येत असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. ही मुंबई आहे, वाजवायचं असेल तर ढोल आणि लेझीमच वाजली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे ठाण्यातील संयुक्त सभेत बोलत होते. मुंबई-ठाण्याचं मराठीपण पुसून टाकण्याचं काम सुरू आहे, पण मुंबई-ठाणे हे आपलं आहे. विकास तर करणारच, पण आधी स्वाभिमान महत्त्वाचा असं राज ठाकरे म्हणाले.
|
|
