म्हसा यात्रेत विक्रमी गर्दी पोलिसांचा चोख बंदोबस्त
अशोक गायकवाड
ठाणे-म्हसा :  म्हसा यात्रेच्या निमित्ताने रविवारी विक्रमी गर्दी झाली. एकाच वेळी लाखो भाविक दाखल झाल्याने परिसरात प्रचंड ताण निर्माण झाला होता. काही ठिकाणी दोन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून तीव्र ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती. अशा कठीण परिस्थितीतही पोलिसांनी संयमाने व नियोजनबद्ध पद्धतीने बंदोबस्त सांभाळत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. यात्रेदरम्यान चोरी, मोबाईल स्नॅचिंग यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांना यश आले. तसेच गर्दीत हरवलेली सुमारे १० ते १५ लहान मुले पोलिसांनी तत्काळ शोधून सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिली. या संपूर्ण बंदोबस्ताचे नेतृत्व एडके साहेब यांनी केले. त्यांना एपीआय संदीपान सोनवणे, एपीआय जाधव, पीएसआय कामडी, पीएसआय अरमाळकर, हवालदार शिंदे तसेच सर्व पोलीस अधिकारी, होमगार्ड अधिकारी अंमलदारांनी समन्वयाने काम करत उत्कृष्ट कामगिरी बजावली. पोलिसांच्या या सतर्क व प्रभावी कामगिरीमुळे मसा यात्रा शांततेत व सुरक्षिततेत पार पडली. सादर बंदोबस्त साठी स्वतः पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लाड यांनी समक्ष थांबून मार्गदर्शन केले. सदर बंदोबस्ता बाबत पोलीस अधीक्षक स्वामी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मित्तल, यांनी मार्गदर्शन केले, परिसरातील लोकप्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *