खाकी वर्दीतील देवदूत- मानसिंग वचकल आणि रामेश्वर खरुळे
कल्याण: ओक हायस्कुल शाळेचे शिक्षक काळे यांना ब्रेन स्ट्रोक आल्याने बॉम्बे हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांना A+ve रक्ताची गरज असल्याने हॉस्पिटल वाल्यांनी A+ve डोनर घेऊन येण्यास सांगितले. आत्ताच बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिर झाल्याने कुणी डोनर मिळत नसल्याने काळे यांच्या  नातेवाईकांना मुंबई पोलीस दलात असलेले सन २००६ चे बॅच चे रामेश्वर खरुळे हे स्वतः  रक्तदाते  असुन युनिक ब्लड मोटीव्हेटर्स फाउंडेशन संस्थेसोबत काम करत असल्याने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नविन मनिषा नगर, बेतुरकर पाडा कल्याण पश्चिम येथे व विविध ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित करत असल्याने अमेरिकेत असलेल्या मिनल सूर्यवंशी यांनी त्यांचे शाळेतील मित्र रामेश्वर खरुळे यांचा नंबर नातेवाईकांना दिला.
रामेश्वर खरुळे रक्तदान सारख्या क्षेत्रात प्रामाणिक काम करत असल्याबाबत त्यांचे परिचयातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी फोन करताच मुंबई सायबर सेल येथे कार्यरत असलेले एपीआय मानसिंग वचकल यांनी तत्काळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदान केले. खाकी वर्दीतील रक्तदुत एपीआय मानसिंग वचकल आणि रामेश्वर खरुळे  यांचे नातेईकांनी मनापासून आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *