मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश देत होळी साजरी

कल्याण:  सम्राट अशोकची लेकरं गाऱ्हाने घालताव रे महाराजा. जो काय आमच्या लेकरानो मोबाईलचो  नाद लागलो हा तो नाद काढून घे  महाराजा. अशा मालवणी भाषेत विद्यार्थ्यांनी पारंपारिक गाऱ्हाने घालत कल्याणच्या सम्राट अशोक शाळेत होळी साजरी करण्यात आली.

मोबाईलचा अतिरेक वापरामुळे विद्यार्थी अभ्यासात दुरावत चालली त्याचा परिणाम गुणवत्तेवर होतोय म्हणून मोबाईलचा अतिरेक वापर टाळा असा संदेश दिला. तसेच होळी खेळतांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नका. नैसर्गिक रंगांचा वापर करा. पर्यावरण रक्षण करा. अशी जनजागृती ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली. कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापक गुलाबराव पाटील विजया तांबे तसेच शिक्षक शिक्षकेतरांसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *