ठाणे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद, ठाणे येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी उज्वला सपकाळे तसेच समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.याप्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समता, न्याय व बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *