राजेंद्र साळसकर
मुंबई :प्रवाशांच्या उन्हाळी हंगामातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकण मार्गावर ४ वातानुकूलित विशेष रेल्वे सेवा चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (सीएसएमटी) ते मडगाव दरम्यान धावणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक ०११२९ (सीएसएमटी – मडगाव वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल व १४ एप्रिलला सीएसएमटी येथून पहाटे २ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक ०११३० (मडगाव – सीएसएमटी वातानुकूलित विशेष) ही गाडी १० एप्रिल २०२६ व १४ एप्रिल २०२६ रोजी मडगाव येथून सायंकाळी १६.०० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
या विशेष गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी आणि करमळी येथे थांबे देण्यात आले आहेत.
या गाड्यांमध्ये १८ वातानुकूलित ३-टियर इकॉनॉमी डबे आणि २ जनरेटर व्हॅनचा समावेश असून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
