उल्हासनगर दि.१७ ( सुनिल इंगळे ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाडीच्या पाण्यात अर्धवट सडलेल्या अवस्थेत एका बेवारस अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगत असताना पोलिसांना मिळून आला आहे. त्या इसमाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.
पोलीस सूत्राने दिले माहितीनुसार मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅजेस्टेका सोसायटी, कासाबेला, डोंबिवली पुर्व येथील खाडीच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तानाजी राठोड यांना मिळाली होती. खाडीच्या पाण्यातून तो मृतदेह बाहेर काढण्यात आला असून तो मृतदेह एका बेवारस अनोळखी हिंदू जातीच्या इसमाचा आहे. साधारण तो मयत इसम ३५ ते ४० वयोगटातील असून याचा चेहरा सडलेल्या व त्यावर किडे पडलेले, उघडा, डाव्या हातावर टॅटू व लाल रंगाचा धागा, ऊजव्या हाताच्या मनगटाला काळया रंगाचा कडदोरा (धागा) तसेच R.D. Deepak असे इंग्रजी भाषेत व त्रिशुळ गोंधलेले, Dollar कंपनीची काळया रंगाची अंडरवेअर, पाठीमागील बाजूस मानेच्या मागे खुप किडे लागलेले, पाठीमागील बाजुस गुप्त भागामध्ये किडे पडलेले, संपुर्ण शरीर हे लाल व काळे पडलेले अंगाने मध्यम, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच अशा वर्णनाचा आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार तानाजी राठोड यांनी दिलेल्या खबर वरून अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे. अद्याप त्या अनोळखी इस्माच्या मृतदेहाची ओळख पटली नसून पोलीस त्या मयत इसमाच्या नातेवाईकांचा शोध घेत आहे. कोणाला त्या अनोळखी इसमा बाबत माहिती असल्यास मानपाडा पोलीस ठाणे संपर्क क्रमांक ०२५१-२९५१९७४ वर संपर्क साधावा असे आवाहन तपासी अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर यांनी केले आहे.
