रमेश औताडे
मुंबई : अनुसूचित जाती आरक्षण ऊपवर्गीकरणाचा निर्णय शासनाने १५ जूनपर्यंत जाहीर न केल्यास पावसाळी अधिवेशनादरम्यान २५ जूनला आझाद मैदानात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मातंग समाजाचे नेते राज्य समन्वयक बाबुराव मुखेडकर यांनी दिला.
मातंग समाजाच्या सोबत इतर जातीना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.आजच्या बैठकीत इतर जातीचे नेते मोठ्या प्रमाणात हजर झाले होते. मातंग समाजाला आरक्षण पाहिजे असा समज सर्वत्र पसरला आहे. मात्र मातंग समाजा बरोबर इतर जातीला आरक्षण पाहिजे असे बाबुराव मुखेडकर यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्य न्यायालयाने आदेश दिले आहेत. अनेक समित्या नेमल्या आहेत. मग हे आरक्षण संविधानिक नाही कसे? असा सवाल यावेळी करण्यात आला. सरकारने वेळोवेळी आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. आंदोलन तीव्र झाले की शिष्टमंडळाला बोलवायचे व वेळ मारून पुढील वेळी बघू असे आश्वासन दिले की काम झाले. मात्र अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा आंदोलन करावे लागते. असे किती दिवस चालणार? असा सवाल बाबुराव मुखेडकर यांनी केला.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *