सरकारी कारवाईत अडथळा प्रकरणी गुन्हा दाखल
कल्याण  : कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बल्ल्याणी नजीकच्या खजुरीनगर परिसरात अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी गेलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अतिक्रमण निष्कासन पथकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना २२ मे रोजी घडली. या घटनेत महिला अधिकाऱ्यांना धक्का बुक्की करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने खजुरीनगर परिसरातील अनधिकृत चाळीचे बांधकाम हटविण्याची कारवाई सुरू केली होती. कारवाईदरम्यान पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र सकाळच्या सुमारास काही महिलांनी अचानक आक्रमक भूमिका घेत कारवाईला विरोध सुरू केला. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर परिस्थिती अधिक चिघळली आणि महिलांनी थेट महापालिका अधिकाऱ्यांवर हल्ला चढविला.
यावेळी महिला अधिकारी यांच्याशी झटापट करीत धक्का बुकक्की केल्या प्रकरणी  सरकारी कामात अडथळा निर्माण करत अधिकारी व कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर महापालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संबंधित महिलांविरोधात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी टिटवाळा पोलीस तपास करीत आहे.
00000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *