मुंबई : बोरिवली पश्चिम येथे सुरु असलेल्या मंडपेश्वर सिव्हिक फेडरेशन आयोजित व रोटरी क्लब ऑफ बोरिवली पुरस्कृत ११ वी एम सी एफ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा पुरुष एकेरी गटाने सुरु झाली. दिवस अखेरीस या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत विश्व् विजेत्या मुंबईच्या प्रशांत मोरेला विजयासाठी तीन सेटपर्यंत झुंजावे लागले. मुंबई उपनगरच्या साबीर शेखने पहिला सेट आठव्या बोर्डनंतर १७-१४ असा जिंकून कॅरम रसिकांची मने जिंकली होती. तर दुसऱ्या सेटमधील पाचव्या बोर्डाखेरीस साबीर शेख १४-६ असा आघाडीवर होता. परंतु पुढील तीन बोर्ड सलग जिंकत प्रशांतने हा सेट २५-१४ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या सेटमध्ये प्रशांतने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत २५-६ असा विजय मिळवत आगेकूच केली. तत्पूर्वी रोटरी क्लब ऑफ मुंबई डिस्ट्रिक्ट ३१४१ चे गव्हर्नर डॉ मनीष मोटवानी यांच्या शुभहस्ते एक डाव खेळून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ दुर्गेश अरूर, रोटरी क्लब ऑफ बोरिवलीच्या अध्यक्षा केतल तापीवाला, एम सी एफ चे अध्यक्ष निहार जाम्बुसारिया सचिव ऍड सतीश शर्मा, खजिनदार सी ए शरद शेठ, कॅरम स्पर्धेचे समन्वयक महर्षी देसाई, सदस्य हेमंत आशर व हेमल शाह, राज्य कॅरम संघटनेचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सचिव अरुण केदार व खजिनदार अजित सावंत उपस्थित होते.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
सय्यद मोहसीन ( जळगाव ) वि वि विलास आंबवले ( ठाणे ) २५-९, २५-१०
विश्वनाथ देवरुखकर ( मुंबई उपनगर ) वि वि व्हिन्सेंट डिसोझा ( मुंबई ) ६-२५, १९-७, २३-१७
महेश सोळंकी ( मुंबई ) वि वि अनंत गायत्री ( मुंबई ) ७-१७, २३-१३, २१-१७
रहीम खान ( पुणे ) वि वि जोएल वाझ ( पालघर ) २५-०, २५-५
जोनाथन बोनल ( पालघर ) वि वि इस्माईल महंमद इब्राहिम खान ( मुंबई उपनगर ) २५-२०, २५-६
जितेंद्र काळे ( मुंबई ) वि वि महर्षी देसाई ( मुंबई उपनगर ) २५-८, २५-०
संजय मांडे ( ठाणे ) वि वि सतीश कांबळे ( मुंबई ) २५-०, २५-०
सार्थ मोरे ( मुंबई ) वि वि रुपेश मोहोळ ( पुणे ) २५-११, २४-१७
०००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *