मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघातर्फे अमृत महोत्सवी क्रीडापटू गोविंदराव मोहिते ट्रॉफी १६ वर्षाखालील शालेय मुलामुलींसाठी विनाशुल्क कॅरम स्पर्धा १ जून रोजी आयोजित करण्यात आली आहे. परेल येथील आरएमएमएस सभागृहात होणाऱ्या स्पर्धेतील पहिल्या आठ विजेत्या-उपविजेत्यांना आकर्षक पुरस्कार दिले जाणार आहेत. शालेय खेळाडूंना डीएसओ कॅरम स्पर्धेच्या तयारीसाठी सरावात्मक विनाशुल्क उपक्रम राबविण्यासाठी संयोजक यंदाही प्रयत्नशील आहेत.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून होणाऱ्या शालेय मुलामुलींच्या कॅरम स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन लाभणार आहे. चँम्पियन बोर्डावर सरावात्मक खेळ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत लवकरच कॅरमप्रेमी दशरथ चव्हाण स्मृती शालेय मुलांसाठी आयडियल कॅरम केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या शालेय खेळाडूंनी मोफत प्रवेश अर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा प्रमुख पंच अविनाश महाडिक (९००४७ ५४५०७) यांच्याकडे २९ मेपर्यंत संपर्क साधावा.
००००००००
