कल्याण : भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्याने ३१/०८/२०२६ पर्यंत पेयजलाचे नियोजन करण्याचे निर्देश सन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्राप्त आहेत. त्यानुसार याबाबत जलसंपदा विभागासोबत दि. १४/०५/२०२६ रोजी झालेल्या बैठकीमधील निर्णयाप्रमाणे, आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये म्हणून सर्व महानगरपालिका, महाराष्ट्र औदयोगिक विकास महामंडळ व अन्य प्राधिकरणांनी वेळोवेळी समन्वयाने पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा मंगळवार ०२/०६/२०२६ रोजी सकाळी ८ वा. ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तासाकरीता पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रांमधून कल्याण (पूर्व व पश्चिम), कल्याण ग्रामीण विभाग (मांडा-टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी व कल्याण ग्रामीण विभागातील इतर गावे) व डोंबिवली (पूर्व व पश्चिम) परिसरास होणारा पाणी पुरवठा मंगळवार ०२/०६/२०२६ रोजी सकाळी ८ वा ते रात्री ८ वाजेपर्यंत १२ तासाकरीता बंद राहणार असून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आवश्यक इतकाच पाणी साठा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश डावरे यांनी केले आहे.
