भारतीयांच्या औषधांच्या खर्चात १२८ कोटी रुपयांहून अधिक बचत केली
ठाणे : परवडणाऱ्या ब्रँडेड- जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील सर्वात विश्वासार्ह प्लॅटफॉर्म असलेल्या प्लॅटिनमआरएक्सने मोठा टप्पा गाठला असून देशभरातील १० लाखांहून अधिक रुग्णांना आपली सेवा दिली आहे. दर्जेदार जेनेरिक पर्याय उपलब्ध करून देत कंपनीने ग्राहकांच्या औषध खर्चात एकूण १२८ कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केली आहे.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजारांमुळे लाखो भारतीयांना दरमहा २,००० ते ५,००० रुपयांपर्यंत औषधांवर खर्च करावा लागतो. या वाढत्या खर्चामुळे ७० कोटींहून अधिक लोक औषधांचे डोस चुकवतात, औषधे पुन्हा घेण्यास उशीर करतात किंवा उपचार अर्धवट सोडतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्लॅटिनमआरएक्सची सुरुवात करण्यात आली.
हा प्लॅटफॉर्म प्रत्येक औषधासाठी एक काळजीपूर्वक निवडलेला आणि उच्च दर्जाचा ब्रँडेड जेनेरिक पर्याय उपलब्ध करून देतो. ही औषधे नामांकित फार्मा कंपन्यांकडून थेट घेतली जातात आणि त्यामध्ये मूळ ब्रँडेड औषधांप्रमाणेच १०० टक्के समान सॉल्ट कॉम्पोझिशन असते. परवानाधारक फार्मासिस्टमार्फत औषधे दिली जातात आणि भारतातील २० हजारांहून अधिक पिनकोडपर्यंत डिलिव्हरी केली जाते. मोठ्या शहरांमध्ये एका दिवसात, तर इतर भागांत १ ते ३ दिवसांत औषधे पोहोचवली जातात. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रुग्ण गुणवत्ता आणि सुरक्षिततेत कोणतीही तडजोड न करता दर महिन्याला औषधांच्या खर्चात ५० ते ६० टक्के बचत करू शकतात.
आशुतोष पांडे, सह-संस्थापक, प्लॅटिनमआरएक्स म्हणाले, “भारतीय रुग्णांचे १२८ कोटी रुपये वाचणे हे आमच्यासाठी केवळ आकडेवारी नाही, हे ते पैसे आहेत जे आता कुटुंबांच्या दैनंदिन गरजांसाठी, मुलांच्या शिक्षणासाठी आणि घरखर्चासाठी वापरले जात आहेत. औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक ताण येतो आणि अनेकदा या गरजा मागे पडतात. आमचा विश्वास आहे की चांगल्या दर्जाची औषधे ही लक्झरी असू नयेत, प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत मिळायला हवी. आज जवळपास १० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचल्यानंतर हा विचार मोठ्या बदलाचे रूप घेत आहे.”
प्लॅटिनमआरएक्सची स्थापना आशुतोष पांडे आणि पियुष कुमार यांनी केली. हे दोघेही अनुक्रमे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कोलकाता येथील माजी विद्यार्थी आहेत. भारतात परवडणारी औषधे उपलब्ध असली तरी लोकांमध्ये विश्वास आणि योग्य माहितीची कमतरता आहे, या विचारातून त्यांनी कंपनी सुरू केली. रुग्णांमध्ये ब्रँडेड जेनेरिक औषधांचा वापर २०२४ मध्ये २२ टक्के होता, तो २०२५ मध्ये जवळपास दुपटीने वाढून ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. २०२६ अखेरीस हा आकडा ७० टक्क्यांहून जास्त होण्याची अपेक्षा आहे. या आकडेवारीवरून रुग्णांचा ब्रँडेड जेनेरिक औषधांवरील विश्वास हळूहळू वाढत असल्याचे दिसून येत आहे. दीर्घकालीन आजार असलेले रुग्ण दरमहा औषधांच्या खर्चात सरासरी १,५०० रुपयांची बचत करत आहेत.
