कल्याणच्या काळा तलावात मृत मासे प्रकरण
काळा तलावातील मासे काढून तलाव स्वच्छ करण्याचे काम सुरू

कल्याण : कल्याण शहरातील काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. तलावाच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक नागरिक सकाळ संध्याकाळ काळा तलाव येथे फिरण्यासाठी चालण्यासाठी तसंच व्यायाम करण्यासाठी येत असतात. त्यांना मोठ्या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. तलावाच्या पाण्यावर आणि किनाऱ्यावर शेकडो मासे मृत अवस्थेत तरंगताना दिसून आले होते. नागरिकांकडून  तलाव स्वच्छ करण्याची मागणी होत होती. वाढते तापमानामुळे माशांचा मृत्यू झाल्याची केडीएमसीनी निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे गर्मीमुळे आणखी मासे मरुन दुर्गंधी पसरू नये यासाठी  केडीएमसी कडून जिवंत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *