ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही येत्या 20 मे 2024 रोजी रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार श्री राजन बाबुराव विचारे व ओबीसी जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. तर आज दुपारी 3 वाजेपर्यंत 21 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नामनिर्देशन अर्ज दिले जात आहे. यात अपक्ष 10, दिल्ली जनता पार्टी 3, लोकराज्य पक्ष 1, हिंदू समाज पार्टी 3, धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच 1,बहुजन समाज पार्टी 2, भारतीय राष्ट्रवादी पार्टी 1 आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नामनिर्देशन पत्रे घेऊन गेले आहेत.
