सातारा दि.३०:ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” या कथासंग्रहाला कुंडल कृष्णाई प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.प्रतिष्ठानच्या वतीने कादंबरी,कवितासंग्रह,बाल साहित्य,उत्तेजनार्थ इत्यादी उत्कृष्ट मराठी वांग्मय निर्मितीला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.सातारा येथील कुंडल कृष्णाईचे संस्थापक अध्यक्ष,निवृत्त पोलीस अधीक्षक,हणमंतराव जगदाळे यांनी नुकतेच हे पुरस्कार जाहीर केले आहेत.याअगोदर कथालेखक काशिनाथ माटल यांच्या “सावट” कथासंग्रहाला फलटण येथून छत्रपती धर्मवीर राजे साहित्य पुरस्कार आणि जुन्नर येथून राज्यस्तरीय शिवांजली साहित्य पुरस्कार मिळाले आहेत.पुण्याच्या चपराक प्रकाशांच्या वतीने दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कोविड काळावरील राज्यातील पहिले पुस्तक म्हणून प्रकाशित झाले होते.या अभिनंदनीय निवडीबद्दल सर्वच स्तरातून कथालेखक काशिनाथ माटल यांचे अभिनंदन होत आहे. आतापर्यंत १) अनुबंध,२) एक क्षण,३) खेळ मांडियेला नवा, ४) बेवारस, ५) सावट हे प्रकाशित झालेले ५ कथासंग्रह आहेत.
