कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) आणि बेस्टतर्फे जागतिक तंबाखूमुक्त दिन २०२६ निमित्त आयोजित “तंबाखूमुक्त बेस्ट” उपक्रमादरम्यान बेस्टचे चालक आणि वाहक उपस्थित होते. कुलाबा येथील बेस्ट इलेक्ट्रिक हाऊसमध्ये आयोजित या उपक्रमात तंबाखूविरोधी जनजागृती मोहीम, हवन समारंभ, कॅन्सर किड्स अपील, तंबाखूचे व्यसन सोडलेल्या बेस्ट चालक आणि वाहकांचा सत्कार, बेस्ट बसमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती पोस्टर्सचे अनावरण तसेच महिला वाहकांच्या नेतृत्वाखाली प्रभावी फलक मोहीम आयोजित करण्यात आली. या उपक्रमाद्वारे मुंबईच्या सार्वजनिक परिवहन कर्मचाऱ्यांमध्ये तंबाखूमुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
०००००००००
