अशोक गायकवाड
पनवेल : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सख्खे चुलत बंधू आणि आमदार प्रशांत ठाकूर व परेशशेठ ठाकूर यांचे काका, प्रसिद्ध उद्योगपती कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी येथे जन्माला आलेल्या कान्हाशेठ ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगधंद्यात जम बसविला. एकेकाळी मचव्यातून रेती व्यवसाय करीत असलेले कान्हाशेठ ठाकूर आज रेल्वेमधील प्रसिद्ध ठेकेदार म्हणून गणले गेले. न्हावा ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या निर्भिड स्वभावाप्रमाणे त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली. उद्योगधंद्यात नावारुपाला आल्यानंतर अनेक गरजूंना त्यांनी उदारहस्ते मदत केली. देवभोळे असल्यामुळे अनेक धार्मिक कार्यांना, मंदिरांनाही त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. उद्योगधंद्यात कार्यरत असताना आपल्या न्हावेखाडी गावाकडे त्यांचे नेहमीच लक्ष असायचे. उद्योगव्यवसायात त्यांची मुले, सागरशेठ ठाकूर, सम्राट ठाकूर, रोशन ठाकूर, जावई अल्केश बैकर त्यांचा वारसा चालवत आहेत. कान्हाशेठ यांच्या पश्‍चात धर्मपत्नी देवकाबाई (बाय) ठाकूर, तीन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे आणि मोठा ठाकूर परिवार आहे. कान्हाशेठ ठाकूर यांच्या पार्थिवावर न्हावेखाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, पनवेलचे महापौर नितीन पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, कृष्णाशेठ ठाकूर, नगरसेवक परेश ठाकूर, माजी विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे, नगरसेवक अजय बहिरा, प्रवीण पाटील, मधु पाटील, नरेंद्र ठाकूर, वासुदेव पाटील, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, उद्योगपती विजय जाधव कडू, वसंतशेठ पाटील, भाऊशेठ पाटील, सुनिल म्हसकर, चेतन उर्फ भायाशेठ म्हात्रे, संजय पाटील, हरिश्‍चंद्र पाटील यांच्यासह नातेवाईक आप्तेष्ट, मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *