उल्हासनगरातील पॅनल क्रमांक ७ मधील
सुनिल इंगळे
उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक ७ मधील इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. बऱ्याच वर्षापासून या रस्त्याचे काम झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्याआधी या रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी कंपनी मालकांसह परिसरातील उद्योजकांकडून केली जात होती. अखेर इंडस्ट्रियल एरियाच्या रस्त्याच्या कामाची भूमिपूजन माजी आमदार पप्पू कलानी व महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला. त्याचवेळी त्या रस्त्याचे काम देखील सुरू करण्यात आले.
महापौर अश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक ७ मधील विकास कामांना गती देत त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांनी जवळपास ४० करोड रुपयांचा मूलभूत सुविधा निधी उपलब्ध करण्यात आले असून याच निधीच्या अंतर्गत सुमारे एक करोड रुपयांच्या निधीतून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक नागरिकांनी, व्यापारी वर्गांनी महापौर अश्विनी निकम यांचे आभार प्रकट केले आहे. या रस्त्याच्या निर्मनामुळे इंडस्ट्रियल एरियाच्या परिसराची शोभा वाढली आहे. या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, सभागृह नेता अरुण आशान, नगरसेवक जमनादास पुरसवाणी, दुर्गा राय, नगरसेविका संघमित्रा हजारे, कमलेश निकम, राजवानी यांच्यासह परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ७ मध्ये हा रस्ता सिमेंट काँक्रिटी तयार करण्यात येणार आहे. इंडस्ट्रियल एरियाचा हा सिमेंट काँक्रिटी रस्ता २० दिवसाच्या आत पूर्ण करण्यात येणार असल्याचे कमलेश निकम यांनी सांगितले.
