रस्त्यावर थुंकल्याचा जाब विचारणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला ओला चालकाने मारहाण केल्याची घटना ज्युपिटर रुग्णालयाजवळ घडली. या दुर्घटनेत जखमी झालेले ७० वर्षीय सरोश दस्तुर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी आज सरोश दस्तुर यांची रुग्णालयात जावून भेट घेवून त्यांच्या तब्बेतीची विचारपूस केली व त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
0000000
