सहा उमेदवारांचे अर्ज दाखल
ठाणे : 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन अर्ज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी सादर केले. तर काल दुपारी तीन वाजेपर्यंत पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
काल दाखल केलेल्या अर्जामध्ये सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार सुभाषचंद्र झा, भारतीय राजनितीक विकल्प पक्षाचे उमेदवार सुरेंद्रकुमार के जैन, आधार समाज पार्टीच्या उमेदवार अर्चना दिनकर गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राहूल जगदीशसिंघ मेहरोलिया, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत विठ्ठल सोनावणे, डॉ पियूष के. सक्सेना यांनी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले.
तर काल दुपारी तीन वाजेपर्यंत पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडी -2
आझाद समाज पार्टी -1
भारतीय जनता पार्टी -1
अपक्ष -1