मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोधSlug – द्विपक्ष राजकीय प्रणाली आणा — करणी सेना
रमेश औताडे
मुंबई : लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकात लोकसभा व विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ करण्याचा निर्णयापेक्षा देशातील राजकीय अस्थिरता नष्ट करण्यासाठी “द्विपक्षीय राजकीय प्रणाली” साठी घटना दुरुस्ती करा असे “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात सेंगर यानी देशाची प्रगति व विकास हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन सारखा होऊ शकली नाही यास बहुपक्षीय राजकीय प्रणाली कारणीभूत आहे असा उल्लेख केला आहे. या पत्रात अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्ष हे जाती, धर्म व भाषावाद सारखे मुद्दे व राजकीय भ्रष्टाचाराच्या समस्या निर्माण करून सामाजिक विषमता निर्माण करत आहेत. याबाबत त्यांनी  चिंता व्यक्त केली. राजकीय स्थिरता एक सफल लोकतंत्रासाठी द्विपक्षीय प्रणालीची आवश्यकता फार जरूरी आहे. द्विपक्षीय प्रणाली मध्यमार्गी विचारांना प्रोत्साहन देते आणि राजकीय पक्षांना अशा समान भूमिका घेण्यास प्रवृत्त करते, ज्या मतदारांच्या मोठ्या वर्गाला आकर्षित करतात. यामुळे राजकीय स्थिरता येऊ शकते,
त्यात कमी मतभेद आणि अधिक सलोखा असतो यामुळे विकासाला चालना मिळेल असे सेंगर यांनी सांगितले.

बहुपक्षीय प्रणालींमुळे काहीवेळा त्रिशंकू संसद निर्माण होऊ शकते, राजकीय अस्थिरताने विकास खूटला जातो. प्रत्येक पक्ष हा फोड़ा फोड़ीच्या राजकारणात व्यस्त आहे, देशात बहुपक्ष राजकीय प्रणालीने लोकशाहीला नाकारत धनशाही आणली आहे परिणामी भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणात वाढला आहे. द्विपक्ष राजकीय प्रणाली सोबत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहण्याची तरतूद करण्यात यावी. जर निवडून आल्यापेक्षा बरोबर त्यांनी कोणत्याही एका पक्षात पक्ष प्रवेश करावा जेणेकरून प्रत्येक नागरिकाला निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा अधिकार सुद्धा प्राप्त होईल असे या पत्रात नमूद केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *