पारनेर : जिल्हा सहकारी बँक व जीएस महानगर बँकेचे दिवंगत माजी अध्यक्ष अॅड. उदयराव गुलाबराव शेळके यांच्या जयंतीनिमित्त मुंबईतील शेकडो दिव्यांग मुलांना काठी वाटप (ब्लाइंड स्टीक) करण्यात आले. जीएस महानगर बँकेच्या अध्यक्षा गीतांजली शेळके यांच्या हस्ते त्याचे वाटप झाले. बँकेचे संचालक सतीश खणकर, मंगेश खोसे, मंगेश थोरात, कुंदा खोसे, छाया वाढवणे, आदी यावेळी उपस्थित होते. उदय शेळके यांच्या जयंतीनिमित्त जीएस महानगर परिवाराने या उपक्रमाद्वारे नवा आदर्श घालून दिला. यावेळी गीतांजली शेळके यांच्यासह उपस्थितांनी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जीएस महानगर परिवार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही गीतांजली शेळके यांनी दिली.
