अनिल ठाणेकर
ठाणे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांच्या पुढाकाराने व प्रेरणेने सन १९८६ पासून माजी नगरसेवक उमेश पाटील यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम अखंडपणे राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असलेली छत्री मोफत उपलब्ध करून देत त्यांच्या सेवेसाठी हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर शर्मिला पिंपलोळकर उपस्थित होत्या.
यावेळी सभागृह नेते हणमंत जगदाळे, उपशहरप्रमुख नथु पाटील, उद्योजक जगदीश पाटील, सिकंदर केणी, उपशहरप्रमुख राकेश पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभा सहसंघटक रचना पाटील, शाखाप्रमुख राधेय वराडकर, शाखाप्रमुख निनाद बोऱ्हाडे, बाळकृष्ण म्हात्रे, प्रविण पवार, गणेश परब, जय पाटील, दुर्गेश चाळके, प्रशांत पाटील, पूनम पाटील, कुणाल म्हात्रे, सुजय पाटील, अर्चना पाटील, प्रियंका भरम, निर्मला कदम, रेखा रहाटे, रश्मी दळवी, स्मिता आयरे उपस्थित होते.
काशिनाथ पाटील, सयाबाई पाटील, जयराम पाटील आणि स्व. लक्ष्मण काशिनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ खारीगाव व पारसिक नगर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. गेल्या चार दशकांपासून सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची परंपरा यंदाही कायम राखण्यात आली. यावर्षीही मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून छत्र्यांचा लाभ घेतला. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या परंपरेचे स्वागत केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम ठेवण्याची गरज व्यक्त करत, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सेवाभाव हीच खरी समाजसेवा असल्याचे सांगितले. गेल्या ४० वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेला हा छत्री वाटपाचा उपक्रम परिसरातील सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *