कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेतर्फे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, पितृतुल्य-मातृतुल्य ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात आनंदाचे काही क्षण निर्माण व्हावेत, या भावनेतून ‘शिक्कामोर्तब’ या नाट्यप्रयोगाचे मोफत आयोजन मंगळवारी कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे करण्यात आले होते. पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या नाट्य प्रयोगास ज्येष्ठ नागरिकांनी तुफान गर्दी केली होती.
यावेळी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांचे पेढा, गुलाब पुष्प, महिलांना गजरा आणि पिण्याची बाटली देऊन स्वागत करण्यात आले. ज्येष्ठांच्या प्रचंड गर्दीत साजरा झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी भरपुर आनंद लुटला. तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी उध्दव ठाकरे यांना भरभरून आशिर्वाद दिले असल्याची माहिती उपनेते विजय साळवी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *