मुकुंद रांजाणे
माथेरान : भारत निवडणूक आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात एसआयआर अंतर्गत मतदार नाव नोंदणीची मोहीम सुरु आहे. माथेरान येथील बाजार पेठ, शिवाजी महाराज नगर, संत गाडगे महाराज विभाग, रेल्वे स्टेशन व पंचवटी नगर या विभागातील मतदारांनी गुरुवारी आयोजित केलेल्या विशेष मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सध्या माथेरान येथे मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे मराठा भवन या समाज हॉल मध्ये मतदार उपस्थित राहिले होते. त्यामुळे (बिएलओ) शिक्षक विनोद जाधव यांना नाव नोंदणी करण्यास मोठया प्रमाणात मदत झाली सामाजिक कार्यकर्ते निखिल शिंदे, आदित्य भिलारे यांनी या मोहिमेसाठी विशेष प्रयत्न केले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *