आज मुलुंड विधानसभा मतदारसंघातील SIR संदर्भात तसेच विविध संघटनात्मक आणि कार्य आढावा बैठकीस कुडाळ-मालवणचे चे आमदार तसेच ईशान्य मुंबईचे संपर्कप्रमुख सन्माननीय निलेश नारायणराव राणे यानी उपस्थित राहून मतदारसंघातील सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी SIR संदर्भातील नियोजन, आगामी कामकाजाची दिशा, बूथ स्तरावरील संघटन बळकटीकरण, नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच विविध प्रलंबित विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
कार्यकर्त्यांच्या सूचना व मते जाणून घेत आगामी काळात अधिक समन्वयाने, नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्तरावर अधिक वेगाने आणि प्रभावीपणे कार्य करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी, विधानपरिषदेतील आमदार तसेच पालघर चे संपर्क प्रमुख सन्माननीय रविंद्र फाटक साहेब,आमदार अशोक पाटील, शिवसेना सचिव संजय माशिलकर, उपनेते आनंद जाधव, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, आयोजक विभाग प्रमुख जगदीश शेट्टी व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0000
