मुंबई : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सीजेपी  च्या आंदोलनाविरोधात महाराष्ट्र करणी सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या आंदोलनामुळे सामाजिक शांतता भंग झाल्याचा आरोप करत राज्यात तातडीने राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करावा, अशी मागणी करणी सेनेचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
संविधानातील कलम १४ मधील समानतेच्या तत्त्वाचा आधार घेत, अल्पसंख्याक समुदायाला मिळणाऱ्या विशेष सोयी-सवलती रद्द कराव्यात, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.तसेच, देशात जातीय सलोखा निर्माण व्हावा आणि तरुणांमधील जातीयतेची भावना कमी व्हावी यासाठी केंद्र सरकारने जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही करणी सेनेकडून करण्यात आली आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *