ठाणे (०३) : ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागामार्फत शहरात अनधिकृत पोस्टर्स व बॅनर्सविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत १ ते ३ ऑगस्ट २०२६ या तीन दिवसात विविध प्रभागसमिती हद्दीत एकूण ११७ अनधिकृत पोस्टर्स बॅनर्सवर कारवाई करण्यात आली. तर नौपाडा कोपरी येथे २ जणांवर तर दिवा प्रभाग समिती येथे ३ जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई ही सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. १३ जुलै ते ०३ जुलै पर्यत शहरातील २६५१ अनधिकृत पोस्टर्स बॅनरवर कारवाई करण्यात आली असल्याचे अतिक्रमण विभागाने नमूद केले.
प्रभागसमितीनिहाय अनधिकृत पोस्टर्स बॅनर्सवर करण्यात आलेली कारवाई
नौपाडा कोपरी प्रभाग समिती : १८
वागळे प्रभाग समिती : २४
वर्तकनगर प्रभाग समिती : १७
माजिवडा मानपाडा प्रभाग समिती : २८
उथळसर प्रभाग समिती : १३
मुंब्रा प्रभाग समिती : ६
दिवा प्रभाग समिती : ११
००००००
