रमेश औताडे
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दूत फाउंडेशन व दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई कामगारांसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या मेंटॉर व डी आय सी सी आय च्या महिला विभागाच्या सदस्या सीमा कांबळे म्हणाल्या की, “स्वच्छता दूत फाउंडेशन गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगारांना न्याय मिळवून देत आहे.फाउंडेशनच्या समन्वयक मैत्रयी कांबळे यांनी सांगितले की, प्रशिक्षक पाखरे यांच्या फाउंडेशनने प्रशिक्षण व रोजगाराच्या नव्या संधी दिल्या आहेत. काही खासगी कंपन्या सफाई कामगारांच्या प्रशिक्षणासाठी सुमारे ४० हजार रुपये शुल्क आकारतात. मात्र, स्वच्छता दूत फाउंडेशन हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत देत आहे. रत्नमाला राजगिरे, माया साबळे, रिबेका पाखरे, पल्लवी पाखरे, हबीब खान, लता गायकवाड, रामचंद्र गायकवाड यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *