कल्याण :  येथील आचार्य अत्रे रंगमदिरात दिवंगत गायिका, आशा भोसले, गायक रफी आणि सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजलीपर तसेच आणि पाऊस या विषयावरील गाण्यांना श्रोत्यांचा अलोट प्रतिसाद लाभला. यावेळी २२ गायक, गायिका यांनी सहभागी होऊन कार्यक्रमात रंगत भरली. बाहेर मुसळधार पाऊस दिवसभर पडत असतानाही गुणी गायिका-गायकांस श्रध्दांजली अर्पण करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर गान रसिक जमले होते.
यावेळी ना ना करते प्यार, ये गीत किसने छेडा, मेरा प्यार भी तु है, क्या हुआ तेरा वादा, आया सावन झुमके अशी एकाहुन एक सुश्राव्य गाणी सादर करण्यात आली. सायंकाळी ६ ते रात्री १० दरम्यान सादर झालेल्या या कार्यक्रमात सुमन कल्याणपूर, आशा भोसले आणि रफी यांच्या यादगार सुमधुर गाण्यांनी संगीतप्रेमी मंत्रमुग्ध झाले. या कार्यक्रमाचे आयोजन येथील गायक आणि शरद कराओकेचे संचालक शरद ननावरे यांनी केले होते. सुत्रसंचलनाची बाजू अर्चना वाईकर यांनी सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *