रमेश औताडे
मुंबई : मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन हे लोकशाहीच्या हिताचे तर होतेच, पण ते आणीबाणीपेक्षाही अधिक भयानक होते. वर्तमान शासनाने ‘मिसा’ कायद्यानुसार आणीबाणीच्या काळात जेलमध्ये राहिलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर लोकशाही आणि अस्मितेसाठी तब्बल सोळा वर्षे संघर्ष करणाऱ्या नामांतर आंदोलनातील भीम सैनिकांनाही शासनाने पेन्शन घोषित करून त्यांचा सन्मान करावा, असे आवाहन आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी केले. नामांतर शहीद भीम सैनिक दिनानिमित्त इंदौरा, १० नंबर पूल येथील शहीद स्मारकात आयोजित मानवंदना कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सुधा जनबंधू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी दामू दादा कावरे, प्रवीण आवळे, प्रा. रमेश दुपारे, चरणदास गायकवाड, राजू कांबळे, जयदेव चिंवडे, वैशाली तभाने, नरेश खन, विद्यानंद गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
