भिवंडी : राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा शुक्रवार 15 मार्च रोजी भिवंडी शहरात दाखल होत आहे.यानिमित्त मोठा पोलिस फौजफाटा शहरात तैनात करण्यात आला आहे.त्यासाठी गुरुवार पासून शहरात पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे.पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून भिवंडी शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वतः गुरुवारी सायंकाळी भिवंडी शहरातील पोलीस बंदोबस्ताचा कार्यक्रम स्थळी भेट देऊन आढावा घेतला आहे.या ठिकाणी पोलिस बंदोबस्ताची आखणी करीत असतानाचा श्वानपथकाद्वारे परिसराची टेहळणी केली आहे.
नदीनाका येथून पदयात्रेद्वारे राहुल गांधी स्वर्गीय आनंद दिघे चौक या ठिकाणी दाखल होऊन तेथे आयोजित चौक सभेस मार्गदर्शन करतील.त्यानंतर ते कल्याण नाका मार्गे सोनाळे ग्रामपंचायत क्रीडांगण या ठिकाणी मुक्कामा साठी जाणार आहेत.दरम्यान भिवंडी शहरातील राहुल गांधी यांच्या कार्यक्रमानिमित्ताने भिवंडी ग्रामीण व शहर भागात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला असून ठाणे ग्रामीण पोलिसांचे 550 तर ठाणे शहर पोलिसांचे सुमारे 800 असे एकूण 1350 पोलिस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.