रमेश औताडे
मुंबई : विकास आराखड्यात स्मशानभूमीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर अद्यापही पालिकेकडून कोणताही अधिकृत माहिती फलक न लावल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले यांच्या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब मिरजे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ सेक्टर १४ येथील या मोकळ्या भूखंडासमोर रिजसी नावाचा मोठा टॉवर आहे. या टॉवर मधील घरांची विक्री सुरळीत व्हावी यासाठीच प्रशासन जाणूनबुजून स्मशानभूमीचा अधिकृत बोर्ड लावण्यास व बांधकामास टाळाटाळ करत तर नसेल ना ? असे मिरजे यांनी सांगितले. पालिकेकडून होत असलेल्या या दिरंगाई विरोधात मिरजे यांनी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन सादर करून १५ दिवसांचा इशारा दिला आहे.
0000
