नगरपंचायत घोटाळा आला आंगलट
राजीव चंदने
मुरबाड :  नगरपंचायत मध्ये कोट्यावधी रुपयांची कामे न करताच बिले काढून होणाऱ्या चौकशीत आपण अडचणीत येऊ नये,म्हणुन नगरपंचायतचे खात्यात सुमारे आठ लाख रुपये जमा केल्या प्रकरणी आर्थिक घोटाळा करणारा ठेकेदार राहुल हिंदुराव याची पत्रकार प्रकाश जाधव यांनी नगरविकास सचिवाकडे लेखी तक्रार दाखल केली असता,त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्रालयाने ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड नगरपंचायतीला दिले असल्याने हिंदुराव याचे अडचणीत वाढ झाली असुन केलेला आर्थिक घोटाळा चांगलाच आंगलट आल्याने तालुक्यातील ठेकेदारामध्ये खळबळ माजली आहे.
मुरबाड नगरपंचायतचे प्रभाग क्रमांक तेरा मध्ये कागदोपत्री कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत, परंतु नागरिकांच्या समस्या वाढत्या तक्रारी पाहता याबाबत नगरपंचायत कडे पत्रव्यवहार केला असता राहुल हिंदुराव या ठेकेदाराने सन २०२३ मध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत.परंतु त्याने सुमारे आठ लाख रुपये नगरपंचायतचे खात्यात जमा का केले, याची चौकशी केली असता.सदर प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नागरिकांनी तक्रारी केल्या असून.त्याची उपविभागीय अधिकारी कल्याण हे चौकशी करत आहेत असे सांगण्यात आले.दरम्यान मे २०२६ मध्ये नगरपंचायतचे वार्षिक लेखा परीक्षण अहवालाची प्रत हाती आली असता.राहुल हिंदुराव याने जमा केलेली रक्कम नगरपंचायतकडे बेवारशी असल्याचे समजले.अधिक चौकशी केली असता ती रक्कम कोणत्या कामावर खर्च करावी किंवा तिचा विनियोग काय करावा याचे कोडे नगरपंचायतला उलगडत नव्हते.अखेर याप्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यासाठी प्रकाश जाधव यांनी राज्याचे नगरविकास सचिव यांचेकडे लेखी तक्रार दाखल केली असता.नगरविकास विभागाने सदर प्रकरणाची ठाणे जिल्हाधिकारी व मुरबाड नगरपंचायत यांनी चौकशी करून तातडीने कारवाई करावी व झालेल्या कार्यवाहीचा अहवाल नगरविकास विभागाकडे सादर करावा असे आदेश दिले असल्याने या आर्थिक घोटाळ्यावर जिल्हाधिकारी आणि मुरबाड नगरपंचायत  कारवाई करणार की हिंदुराव याला क्लिनचीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *