मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनद्वारे (एमसीए) आयोजित स्पर्धांमध्ये राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर (आरसीएफ) क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आरसीएफ स्पोर्ट्स क्लबतर्फे क्रिकेट निवडचाचणी (ट्रायल्स) आयोजित करण्यात आली आहे. ही चाचणी सोमवारी (७ सप्टेंबर) सकाळी १० वाजता चेंबूर येथील आरसीएफ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर घेतली जाईल. १८ वर्षांवरील खेळाडू या चाचणीसाठी पात्र आहेत. इच्छुक खेळाडूंनी पांढऱ्या गणवेशात आणि क्रिकेटचे संपूर्ण साहित्य (किट) सोबत घेऊन मैदानावर उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सुनील कुलकर्णी (मोबाईल: ७९७७०६७५६४) यांच्याशी संपर्क साधावा.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *