प्रथमच उभारला आठ थराचा मानवी मनोरा
राजेंद्र साळसकर
मुंबई- भगवान श्रीकृष्णाच्या बाललिलांच्या स्मरणाच्या उत्सवाचा सण म्हणजे गोपाळकाला. हा सण  अभुतपूर्व व मोठ्या जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा झाला. विविध  राजकीय पक्षांच्या  आणि नेत्यांच्यावतीने लाखो रूपयांच्या बक्षिसांच्या दहिहंडीचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात आले होते. मंडळाच्या वतीने ठाणे येथील संकल्प प्रतिष्ठानच्य हंडीसाठी दक्षिण मुंबईतील पहिले आणि महाराष्ट्रातील दुसरे डबल दुरीचे ३ एक्के करत ८ थर रचण्याचा ऐतिहासिक विक्रम* काळाचौकी येथील जिजामाता नगर गोविंदा पथकाकडून करण्यात आला.
या ऐतिहासिक कामगिरीचे विशेष कौतुक म्हणजे, जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या इतिहासातील पहिले २०११ चे ७ थर आणि मंडळाच्या इतिहासातील पहिले ८ थरांची रचना मंडळाचे प्रमुख प्रशिक्षक तसेच अध्यक्ष  चेतन मोरेश्वर पवार यांच्या कार्यकाळात झाली आहे.  ही ऐतिहासिक कामगिरी म्हणजे जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या शौर्य, जिद्द, एकजूट, मेहनत आणि संघभावनेचा अभिमानास्पद विजय! जिजामाता नगर गोविंदा पथकाचया या गोविदा पथकाच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्गल जिजामातानगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुशील साळसकर यांनी अभिनंदन केले असून संपूर्ण काळाचौकी परिसरातून या गोविंदा पथकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जिजामाता नगर गोविंदा पथकाच्या कामगिरीमुळे या पथकातील सर्व गोविदांचा विश्वास दुणावला असून पुढील वर्षी नऊ मानवी मनोरा रचण्याचा मनोदय  मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रशिक्षक चेतन पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *